सुशिक्षित बेरोजगार
उमेदवारांसाठी 8 फेब्रुवारी रोजी
जागेवरच निवड संधी
मोहिमेचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली
यांच्यामार्फत दि. 8 फेब्रुवारी, 2023
रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा
यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली
यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली
आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी
विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त
उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा,
हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे
आयोजन करण्यात आले आहे.
या महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दि. 8 फेब्रुवारी, 2023 रोजी टाटा मनसा
मोटर्स हिंगोली व एसबीआय लाईफ इन्शूरन्स कंपनी लि.हिंगोली हे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी या शैक्षणिक आर्हतेनुसार 20 पेक्षा अधिक
रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या
संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन
नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने
उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा
9881150352 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment