अप्पर
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा
कृतीदलाची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 07 : अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली
आज जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे प्रतिनिधी विवेक वाकडे, प्र.बाल कल्याण पोलीस अधिकारी विशाखा
धुळे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे सहायकआयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, समाज
कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, नगर परिषद मुख्याधिकारी,
शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डी.पी.
नेहुल, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृतीदल समन्वयक
सरस्वती कोरडे व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद
मुडे आदी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी
श्री. परदेशी यांनी मिशन वात्सल्यच्या विविध योजनेचा किती लोकांना लाभ मिळाला याची
माहिती घेतली. तसेच याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात कोविड-19 या आजारामुळे आतापर्यंत मिळालेल्या
माहितीनुसार एकूण 225 बालकांपैकी एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 222 व दोन्ही
पालक गमावलेल्या 03 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अशा एक पालक/दोन्ही
पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेणे सुरु आहे. या 225 बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या
भेटी घेवून बालकांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्याचे काम देखील जिल्हा बाल
संरक्षण कक्षामार्फत वेळोवेळी केले जात आहे. सदरील 225 बालकांपैकी 213 बालकांचे बाल
न्याय निधी अंतर्गत इयत्तानिहाय बाल न्याय निधी वितरीत करण्यात आला असून नव्याने आढळून
आलेल्या 06 बालकांच्या पालकांकडून बाल न्याय निधीसाठी अर्ज मागविण्यात आले असून त्यांच्या
खात्यावर बाल न्याय निधी अंतर्गत इयत्ता निहाय निधी टाकण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा
माहिती व बालविकास अधिकारी तथा जिल्हा कृती दलाचे सदस्य सचिव विठ्ठल शिंदे यांनी दिली.
एक युध्द नशे के विरुध्द...
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR) नवी दिल्ली ड्रग्स आणि मादक द्रव्यांचे सेवन प्रतिबंधक मध्ये बालक आणि बेकायदेशीर तस्करी या विषयावर एक संयुक्त कृति योजना विकसित आणि जारी केली आहे. हा संयुक्त कृती आराखडा देशातील मुलांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी
श्री. परदेशी यांनी संयुक्त कृती आराखडा तयार करावे. तसेच विविध विभागाच्या माध्यमातून
जनजागृती मोहिम राबवावी. कोटपा कायद्याची अंमलबजावणी करावी. शाळेत सीसी टीव्ही कॅमेरे
लावावेत, अशा सूचना दिल्या.
*****
No comments:
Post a Comment