13 February, 2023

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारी रोजी

रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॅशनल कॅरिअर सर्व्हिस, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 फेब्रुवारी, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हिंगोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे (महिंद्रा ॲन्ड महिंद्रा पुणे, एन्डयुरन्स औरंगाबाद), धूत द्रान्समिशन औरंगाबाद, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशन एमआयडीसी चिंचवड पुणे, अभिनव इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट मुंबई, ठाणे, नाशिक, आर्मस इ.प्रा.लि. वाळूज औरंगाबाद, इम्पेरेटीव्ह बिझनेस वेंन्चर्स प्रा.लि.ठाणे, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस प्रा.लि.पुणे, एक्साईड इंडस्ट्रीज लि.औरंगाबाद, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, रक्षा सिक्युरिटी फोर्स हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार एक हजार पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे. जेणेकरुन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), प्लॉट क्र.पी-3, एमआयडीसी परिसर, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

No comments: