किडनी वाचवा आणि
डायलेसीस थांबवा …!
आज तरुणामध्ये उच्च
रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, इन्फेक्शन, हृदयविकार, लठ्ठपणा, कर्करोग, मद्यपान, धुम्रपान,
तंबाखूचे सेवन, पेस्टीसाईड, अनुवंशिक, क्षारयुक्त (जड पाणी), डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
ॲन्टीबायोटिक, पेन किलर घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या
वाईट सवयीमुळे किडनी खराब व निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजची तरुण पिढी याकडे
दुर्लक्ष करीत असल्याने किडनी आराजाचे समाजातील प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यासाठी
किडनी आजार जाणून घेणे, किडनीचे लक्षणे ओळखणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती देणारा
हा लेख …
भारतात किडनी रुग्णांची
संख्या दहा कोटी पेक्षा जास्त आहे. भारतात क्रॉनिक किडनी डिसीजने 17 टक्के लोक ग्रस्त
आहेत. भारतात दरवर्षी दीड लाखाच्या वर किडनी डिसीजने तरुण वर्ग मृत्यू पावतात. दरवर्षी
दोन लाख पेक्षा जास्त नवीन किडनी डिसीज रुग्णांची नोंद होते. एक हजारामध्ये एक व्यक्ती
किडनी स्टोनने ग्रस्त आहे. 12 टक्के भारतीय नागरिकांमध्ये किडनी स्टोन (मुतखडा) चा
त्रास व समस्या त्यांच्या जीवनात एकदा तरी येतात.
किडनी आजाराची लक्षणे : चेहरा व पायावर सूज
दिसणे/येणे. कमी वयात उच्च रक्तदाब, भूक कमी लागणे, उलटी होणे, मळमळ होणे, थोडेसे पायी
चालल्यानंतर दम लागणे, लवकर थकणे. लघवीतून रक्त जाणे, त्वचा कोरडी पडणे, खाज येणे,
लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी करतांना त्रास होणे, थेंब-थेंब लघवी होणे.
वरीलपैकी कोणतेही
एक लक्षण आढळल्यास किडनीचा रोग झाला असल्याच्या शक्यतेचा विचार करुन त्वरित डॉक्टरांकडे
जाऊ तपासणी करावी.
जिल्हा रुग्णालय,
हिंगोली येथे जानेवारी, 2014 पासून डायलेसीस विभाग सुरु करण्यात आला आहे. येथे डायलेसीस
रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. या ठिकाणी प्रधानमंत्री नॅशनल डायलेसीस
प्रोग्राम अंतर्गत गरीब रुग्णांना मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत 261 डायलेसीस रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी
159 रुग्ण हे ॲडमिट (आंतररुग्ण) डायलेसीस रुग्ण
आहेत.
वैद्यकीय तपासणी सुविधा : दररोज वैद्यकीय अधिकारी
यांच्याकडून तपासणी, दर गुरुवारी किडनी विकार तज्ज्ञांकडून तपासणी, फिजिशियन कडून तपासणी,
समुपदेशन, आहार तज्ज्ञांकडून सल्ला, डायलेसीस विभागातील काम करणारे अधिकारी व कर्मचारी
अनुभवी व प्रशिक्षित आहेत.
डायलेसीस विभागात सुविधा : वातानुकुलित सूसज्ज
युनिट, डिजिटल फॉलर बेड, डिजिटल पल्स ऑक्सि मॉनिटर, डिजिटल ईसीजी, सेंट्रल ऑक्सिजन,
इलेक्ट्रीक सक्शन मशीन, जनरेटर उपलब्ध आहे.
तपासण्या : रक्त, लघवी तपासणी व गरजूंना रक्त पुरवठा,
एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन .
लसीकरण : हिपॅटायटिस-बी आणि टिटॅनस लस देण्यात येते.
शासकीय योजना : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,
संजय गांधी निराधार अनुदान योजना, जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे फक्त एकदा दूर्धर
आजारासाठी 10 हजार रुपये अनुदान दिले जाते. रुग्ण व एक नातेवाईक यांना मोफत एसटी बस
पास, रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, जेवण व मोफत औषधी दिल्या जातात.
हिमो डायलेसीस मशीन : डायलेसीस विभागामध्ये
करोना बाधित रुग्णासाठी स्वतंत्र 1 मशीन राखीव ठेवण्यात आली आहे. हिपॅटायटिस-बी व सी
बाधित रुग्णांसाठी स्वातंत्र 02 मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जनरल डायलेसीस रुग्णांसाठी
03 मशीन राखीव असून दरररोज सकाळी एक सत्र व दुपारी एक सत्र अशा रितीने दिवसातून दोन
सत्रात सकाळी 9.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत डायलेसीस केले जातात. फक्त दर रविवारी
डायलेसीस युनिट बंद राहते. अत्यावश्यक रुग्णांसाठी रुग्णवाहिका व व्हिलचेअर उपलब्ध
आहेत.
किडनीच्या आजाराचे
निदान करण्यासाठी लघवी तपासणी, रक्त तपासणीमध्ये रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण, क्रियाटीन
आणि युरियाचे प्रमाण, किडनीची सोनोग्राफी या सर्व तपासण्या जिल्हा रुग्णालयात मोफत
करण्यात येतात. किडनीचे आजार डायलेसीस, किडनी प्रत्यारोपण याविषयी माहिती, शंका, प्रश्न
असतील तर गरजूंनी डायलेसीस विभाग प्रमुख डॉ. तुकाराम आऊलवार यांच्याशी भ्रमणध्वनी क्र.
8080316559 वर सकाळी 11.00 ते 12.00 या दरम्यान संपर्क साधून माहिती मिळवता येईल. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा.
किडनी आजारावषियी
वेळीच दक्षता घेऊन व त्यावर उपचार करुन किडनी वाचवू या आणि डायलेसीस थांबवू या…!
--
चंद्रकांत स. कारभारी
माहिती
सहायक
जिल्हा
माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment