तलावातील गाळ काढणे व जलस्त्रोत
पुर्नस्थापित करण्यासाठी
विहित वेळेत कामे पूर्ण करावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 17 : अमृत महोत्सव अंतर्गत तलावातील गाळ काढणे व जलस्त्रोत
पुर्नस्थापित करण्यासाठी जलसंधारण विभाग, पूर्णा पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेचे
जलसंधारण विभाग यांनी विहित वेळेत कामे पूर्ण करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान 2.0 व गाळमुक्त
धरण गाळयुक्त शिवार या योजनेची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच पार पडली. या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
कळमनुरी व हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी व इतर विभागाचे
विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करावी. गावाची निवड
दि. 3 जानेवारी, 2023 च्या शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करुन करावी. तसेच प्रधानमंत्री
कृषि सिंचन योजना 2.0 च्या कामांचा प्रगती अहवाल सादर करावा. तसेच मार्च, 2023 पर्यंत
कामे पूर्ण करावेत, असे आदेश संबंधित विभागाला दिले.
हिंगोली जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार
ही योजना शासन निर्णयानुसार चालू करण्यात आली आहे. ज्या तलावातील गाळ काढावयाचा आहे
अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडे नाव नोंदविण्याची कार्यवाही करावी. तसेच
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.पापळकर
यांनी दिले.
*****
No comments:
Post a Comment