प्रधानमंत्री किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती
आयपीपीबीमध्ये उघडण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर, 2022
ते मार्च, 2023 या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची
बँक खाती आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे.
कृषी आयुक्तालयातील
उपायुक्त (कृषी गणना) यांनी दूरचित्रवाणी परिषदेमध्ये प्रधान मंत्री किसान योजनेचा
तेरावा हप्ता दि. 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार असल्याचे कळविले आहे. योजनेचा लाभ
केवळ आधार संलग्न असलेल्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार सिडींग प्रलंबित लाभार्थ्यांची
बँक खाती आयपीपीबी (IPPB) मध्ये डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत. प्रलंबित
लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी (IPPB) मध्ये
नव्याने उघडल्यावर पुढील 48 तासांत ती आधार संलग्न होऊन सक्रीय होतील. त्यामुळे
प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी (IPPB) मध्ये उघडण्यात यावीत, असे आवाहन
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment