बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळामध्ये बांधकाम कामगार नोंदणी, नुतनीकरणाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी
नोंदणी, नुतनीकरण करताना स्थानिक ग्रामसेवक/ नगर परिषद यांचे मागील 90 दिवस किंवा त्यापेक्षा
अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, मूळ आधार कार्ड स्कॅनींग करावे, लाईव्ह फोटो, बँक
पासबूक मूळ स्कॅनिंग करावे. स्वयं घोषणा पत्र, आधार समतीपत्र, वारसाची माहिती इत्यादी
कागदपत्रासह आपण स्वत: जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा नेट कॅफेवर जाऊन अर्ज भरावा.
कोणाच्याही भूलथापाना बळी न पडता स्वत: नोंदणी, नुतनीकरण करावे, असे आवाहन सरकारी कामगार
अधिकारी टी. ई. कराड यांनी केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment