31 March, 2020

जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे दोन संशयीत रुग्ण दाखल



हिंगोली दि.31: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) आजाराचे दोन संशयीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये पाहिला संशयीत रुग्ण हा पुरुष असून त्यांचे वय 54 वर्ष असून, या रुग्णांस दि. 30 मार्च, 2020 रोजी संध्याकाळी 7 वाजता तर दुसऱ्या 49 वर्षीय संशयीत पुरुष रुग्णांस दि. 31 मार्च, 2020 रोजी सकाळी 2 वाजता येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे.  हे दोन्ही रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे दाखल करुन त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार करण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णांचा थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे.
कझाकिस्तान मधुन आलेला 01 तर मालदिव येथून आलेल्या 02 अशा एकुण 03 नागरिकांना सद्यस्थितीत होम क्वारंनटांईन (घरातच विलगीकरण) मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रॅपीड रिस्पॉन्स टिम व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दरदिवशी सदर रुग्णांवर देखरेख ठेवून पाठपुरावा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांना अहवान करण्यात येते की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये केले आहे.


कोरोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा,नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश




             हिंगोली,दि.31: शासनाने कोरोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
            कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे तसेच हजारो लोकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 5 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह  दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देष दिले आहेत.
            हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
आदेश बहुसंख्य व्यक्तींपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालूका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.

****

कोरोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगर पालीका- नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश




             हिंगोली,दि.31: शासनाने कोरोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनां 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
            कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे तसेच हजारो लोकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे इलेक्ट्रीक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 5 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नगरपालीका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या या दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देष देण्यात येत आहेत.
            हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये, तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील सर्व नगरपालीका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या  दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
आदेश बहुसंख्य व्यक्तीपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजी आणि किराणा माल विक्रेत्यांकरीता 14 एप्रिलपर्यंत 144 कलमान्वये मनाई आदेश



हिंगोली,दि.31:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत असल्‍याची माझी खात्री झालेली आहे. त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदीकरीता नागरिक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या संपुर्ण भागामध्ये दि. 23, 24 आणि 29 मार्च, 2020 रोजीच्या आदेशात नमुद केलेल्या बाबी कायम ठेवुन भाजीपाला व किराणामाल विक्रीसाठी खालीलप्रमाणे आदेश लागु करण्यात येत आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी  ठरवुन दिलेल्या  ठिकाणी खालीलप्रमाणे नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकणार आहेत. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एकमिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणामाल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
01/04/2020
बुधवार



   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
03/04/2020
शुक्रवार
3
05/04/2020
रविवार
4
08/04/2020
बुधवार
5
10/04/2020
शुक्रवार
6
12/04/2020
रविवार

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 14 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू



हिंगोली,दि.31:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात नागरिकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचासंसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक असल्‍याने त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत.  
सदर आदेश दि. 01 एप्रिल, 2020 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 14 एप्रिल, 2020 च्या 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत (5) पाच व त्‍या पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी जमण्‍यास किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
या आदेशान्वये हिंगोली जिल्‍ह्यात सांस्‍कृतिक, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण, उत्‍सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्‍पर्धाना मनाई करण्यात येत आहे. तसेच खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्‍प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, देशातंर्गत व परदेशी सहली  इत्यादीचे आयोजन करता येणार नाही. तसेच जिल्‍ह्यात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी  पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येतील असे सर्व दुकाने/सेवा आस्‍थापना, उपहार गृहे / खाद्यगृहे / खानावळ, शॉपींग कॉम्‍लेक्‍स, मॉल्‍स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब/पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्‍यायामशाळा, संग्रहालय तसेच सर्व प्रार्थनास्थळे (उदा. मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणांशिवाय येण्‍यास मनाई करण्यात येत आहे.
सदरील आदेश खालील बाबीकरीता लागु होणार नसून, यामध्ये शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / अस्‍थापना, अत्‍यावश्‍यक सेवेतील व्‍यक्‍ती, रुग्‍णालय, पॅथॉलॉजी-लॅबोरेटरी, दवाखाना सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (अॅलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी), नर्सिंग कॉलेज, रेल्‍वे स्‍टेशन, एस. टी. स्‍टॅण्‍ड, परिवहन थांबे व स्‍थानके, रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप तसेच पुर्वनियोजीत विवाह समारंभ (कमाल 25 व्‍यक्‍तीपुरता मर्यादित), अंत्‍यविधी (कमाल 15 व्‍यक्‍तीपुरता मर्यादित), अत्‍यावश्‍यक किराणा सामान, दुध/दुग्‍धोत्‍पादने, फळे व भाजीपाला, औषधालये अशा जीवनावश्‍यक वस्‍तु विक्रीची ठिकाणे. उपहारगृहांना योग्‍य ती सर्व खबरदारी घेवुन त्यांना खाद्यपदार्थ बनविणे, तसेच पार्सल स्‍वरुपात काऊंटर व इतर मार्गानी विक्री/वितरीत करण्‍यास परवानगी राहणार आहे. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्‍तव्‍यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्‍यविषयक आवश्‍यक ती खबरदारी घेवुन रेस्‍टॉरंटमध्‍ये खाद्यपदार्थ बनवुन देण्‍यास परवानगी राहिल. ज्‍या आस्‍थापना (उदा माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्‍यांच्‍याकडे देश व परदेशातील अतिमहत्‍वाच्‍या (Critical-National & International Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे. व सदर आस्‍थापना बंद राहिल्‍याने अशा उपक्रमांच्‍या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहु शकतील. (परंतू यादृष्‍टीने सदर आस्‍थापना कार्यरत ठेवण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात विशेषरित्‍या कळविणे बंधनकारक आहे.) तसेच प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टि. व्ही. न्‍युज चॅनेल इत्यादी) कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लीपकार्ट, इ. सेवा सुरु राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.  उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्‍वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्‍यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्‍यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्‍टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डावर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

28 March, 2020

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू


        हिंगोली,दि.28:  दि. 02 एप्रिल, 2020 रोजी रामनवमी असल्याने दि. 6 एप्रिली, 2020 रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येतात. पंरतू जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या कालावधीत विविध सण उत्सव असल्याने विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 29 मार्च, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 एप्रिल, 2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पोहचवा -शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश


हिंगोली,दि.28: कोरोना प्रादूर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी शाळेत असलेले पोषण आहार कड धान्य शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे अधिकार शाळेच्या स्थानिक समितीकडे सोपवण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगाली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले असल्याने शाळेत विद्यार्थी नाहीत इयत्ता आठवीपर्यंत सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशावेळी शाळेमध्ये विद्यार्थी येत नसला तरी शाळेतील विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक नियामक मंडळाच्या सल्ल्याने करावी. अर्थात त्यामुळे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस यंत्रणेला देखील माहिती द्यावी. शाळेचा विद्यार्थी उपाशी राहू नये, हा यामागचा उद्देश असून पोषण आहार वाटप करतांना शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होवू नये याची काळजी घ्यावी. शक्यतो हा आहार विद्यार्थ्यांना घरपोच कसा पोहच करता येईल, याची खबरदारी शालेय व्यवस्थापनाने घ्यावी.
शालेय शिक्षण आहार शाळेत पडून न राहता गरजू विद्यार्थ्यांपर्यंत देणे हा या मागचा मुख्य उद्देश असून, शालेय प्रशासनाने यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा असे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यात लोकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे, अशा मजुरांना विविध सेवाभावी संस्थांकडून आणि प्रशासनाकडून मदत केली जात असतांना या मजुरांची मुले देखील जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळेमध्ये जातात. या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणारे शालेय पोषण आहाराचे धान्य कडधान्य शाळेत असतांना हे विद्यार्थी उपाशी राहू नये. याची काळजी शालेय प्रशासनाने घेणे गरजेचे आहे असे ही आदेशात नमूद करण्यात आले  आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अध्यादेश देखील जारी केला असून, या आदेशामुळे मजुरांच्या मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

****

27 March, 2020



अत्यावश्यक सेवा व वस्तुंची वाहतुकीसाठी वाहतूक
परवाना काढण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

हिंगोली दि.27: राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालय, हिंगोली येथे 24x7  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षास संकर्प साधण्यासाठी संपर्क क्रमांक 9021484105 असा आहे.     
अत्यावश्यक सेवा वस्तुंची वाहतूक करण्यासाठी या कार्यालयामार्फत वाहतूक परवाना जारी केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व माल वाहतूकदारांनी त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच संचारबंदीमुळे आपले अर्ज या कार्यालयाच्या mh38@mahatranscom.in या ई-मेल वर वाहन क्रमांक नमुद करुन वाहनाचे कागदपत्र सादर करुन अर्ज केल्यास ई-मेलद्वारे प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****





हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा एक संशयीत रुग्ण

हिंगोली दि.27: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोना कोविड-19 आजाराचा एका संशयीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरील व्यक्ती ही डॉक्टर असून त्यांचे वय 30 वर्ष आहे. हा रुग्ण शासकीय स्त्री रुग्णालय, अकोला येथे कार्यरत असून सद्या हिंगोलीत वास्तव्याला आहे. या रुग्णांस दि. 24 मार्च, 2020 पासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे  दिसून आल्याने त्यास आय.सी.एम.आर. च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचा थ्रोट स्वॅब पुणे येथील एन.आय.व्ही. संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्यांच्या अहवाल येणे अपेक्षीत असून, सदरील संशयीत रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार करण्यात येत आहे.
            तसेच जिल्ह्यात आतापर्यंत परदेशातून फिलीपीन्स येथुन-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01, सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकुण 10 नागरिक आले आहेत. अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये केले आहे.

****



महिला आरोग्य कर्मचारीस मारहाण वृत्ताबाबत खुलासा

हिंगोली,दि.27:  कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता दि. 23 ते दि. 31 मार्च, 2020 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील संपुर्ण हद्दी मध्ये राहण्‍याऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्व महत्वाच्या विविध शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. बुधवार दि. 25 मार्च रोजी कोरोना प्रादूर्भाव संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानतंर्गत कार्यरत प्रियंका साहेबराव राठोड, आरोग्य सहाय्यीका या महिला कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडून वडील पोलिस हवलदार साहेबराव सखाराम राठोड यांच्यासोबत घराकडे जात असतांना येथील अग्रेसन चौकात पोलिसांनी मारहाण केल्याचे वृत्त दि. 26 मार्च रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आले.
परंतू महिला कर्मचारी यांचे वडील पोलिस हवलदार साहेबराव सखाराम राठोड यांनी दि. 26 मार्च रोजी  स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय, हिंगोली येथे येवून आपला जबाब दिल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे. या जबाबामध्ये श्री. राठोड यांनी सांगितले की, ‘दि. 26 मार्च रोजी मी व माझी मुलगी प्रियंका साहेबराव राठोड नांदेड नाक्यावरुन घरी जात असतांना कोरोना विषाणु संदर्भात बंदोबस्तामध्ये असलेल्या सपोनि श्रीमती पुडंगे यांनी मला व माझ्या मुलीला नांदेड नाक्यावर थांबविले. तेंव्हा माझी मुलगी पोलीस मारतील या भीतीपोटी गाडीवरुन घाई गडबडीने खाली उतरत असतांना तिचा तोल जावून खाली पडली. व तिच्या डोक्याला मार लागला. तेंव्हा माझा असा गैरसमज झाला की, ड्युटीवर असलेल्या सपोनि श्रीमती पुंडगे यांनी माझ्या मुलीला मारहाण केल्याने तिच्या डोक्याला दूखापत होवून ती बेशुध्द पडली. तेव्हा सपोनि पुंडगे यांनीच माझ्या मुलीला दवाखान्यात नेले. तसेच मी रागाच्या भरात डॉ. झडपे यांच्या दवाखान्यात गेलो असता तेथे उपस्थिती काही पत्रकारांनी मला थांबवून काय प्रकार झाला याबाबत विचारणा केली. तेव्हा मी माझ्या मुलीला मार लागल्याच्या टेन्शनमध्ये असतांना पत्रकारांनी मला विचारपूस करीत मला काही एक समजू न देता माझी शुटींग केली.व सदर शुटींग व्हॉट्सॲपवर व्हायरल केली. परंतू नंतर माझ्या मुलीकडून मला कळले की, ती गाडीवरुन उतरतांना खाली पडली व तिच्या डोक्याला जखम झाली. माझा सपोनि श्रीमती पुंडगे यांच्याबद्दल गैरसमज झाल्याने मी रागाच्या भरात पत्रकारासमोर बोललो व त्यांनी मला काही माहिती न होवू देता माझी शुटींग केली व व्हॉटसॲपवर व्हायरल केली. त्याबाबत मला काही माहिती नव्हती. व्हॉट्सॲप ग्रुपवर पाहिल्या नंतर मला हा सर्व प्रकार समजला.
सपोनि श्रीमती पुंडगे यांनी घडलेला सर्व प्रकार मला व्यवस्थीत सांगितल्याने माझा गैरसमज दूर झाला असून माझी तसेच माझी मुलगी प्रियंका साहेबराव राठोड  आम्हा दोघांची सपोनी श्रीमती पुंडगे व इतर कोणांविरुध्द तक्रार नसुन माझा गैरसमज दुरु झाला असुन याप्रकाराबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो.’ असा जबाब महिला आरोग्य कर्मचारी प्रियंका साहेबराव राठोड यांच्या वडीलांनी पोलीस विभागाकडे नोंदविला आहे.
या घटनेची दखल जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी घेवून, या घटनेबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करुन त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तरी सर्व वृत्तपत्रांनी सदर घटनेबाबत प्रसिध्द झालेल्या वृत्ताबाबतचा वरील खुलासा आपल्या वृत्तपत्रात प्रसिध्द करावा.

****



जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास कारवाई
- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड 

   हिंगोली,दि.27: जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वितरणात कुठलाही अडथळा येवू देणार नाही तथापी, वितरक, विक्रेत्यांनीही अतिरिक्त दर आकारु नये. अशा स्थितीत काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास  प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र तशी वेळ येऊ नये, ही वेळ देश व समाजाप्रती जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची वेळ आहे. या काळात सर्वांचे सहाकार्य आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.             
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे विक्रेता, वितरण साखळी, उत्पादक, वाहतूकदार व त्यांचा साहाय्यकरी व्यवसायीकाकडून नागरिकांना सेवा पुरविण्यात कुठलाही अडथळा येणार नाही. यासाठी प्रशासनाने संपुर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

****



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
-पालकमंत्री वर्षाताई गायकवाड   

हिंगोली,दि.27: कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती मध्ये उपलब्ध असून, याशिवाय देखील निधी लागल्यास तो निधी देखील उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.     
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या  प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणानी अधिक सक्षम व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मागणीनूसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आरोग्य विषयक साधनसामुग्री, औषधी विषयक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्याकरिता पालकमंत्री दररोज सकाळ-संध्याकाळ संबंधीत अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीवरुन उपाययोजनाबाबत आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करुन संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरीता सज्ज राहण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर पडू नये, अशी विनंती करत काळजी घेवून सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.                                                                 
****

25 March, 2020


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषधी दुकानासाठी वेळ निश्चित

हिंगोली,दि.25: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍याचे परिणाम आरोग्‍यास धोकादायक आहे. त्याकरीता जिल्हाधिकारी यांचे दि. 22 मार्च, 2020 रोजीच्य आदेशान्वये जिवनावश्यक वस्तुंची दूकाने, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, व औषधी दूकाने इत्यादी वगळून हिंगोली जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील औषधी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन औषधी दुकानांवर नागरिकांची होणादी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील दवाखान्याशी संलग्न औषधी दुकाने हॉस्पीटलच्या वेळेनुसार सुरु राहतील. तसेच डॉक्टरच्या चिठ्ठीनुसारच औषधी उपलब्ध करुन देतील. दवाखान्याची वेळ हीच त्यांची वेळ असेल. तसेच  अन्य औषधी दुकाने दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेमार्फत शहर निहाय काही दूरध्वनी क्रमांक दिले जातील ते डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार अन्य वेळेत औषधी उपलब्ध करुन देतील.
याशिवाय हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेने मेडिकल कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी स्टिकर्स द्यावेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र संबंधीत तहसिल कार्यालयातुन हस्तगत करावीत. त्याकरीता कर्मचारी यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक दोन फोटोसह यादी सादर करावी. हिंगोली जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना यांनी प्रत्येक शहरनिहाय औषधी उपलब्ध करुन देणाऱ्या संबंधीतांची नावे व मोबाईल क्रमांक इ. तपशील असलेली यादी तात्काळ प्रसिध्द करावी. वरील आदेशाच्या कालावधीत जनतेला औषधी मिळण्याकरीता कोणत्याही प्रकारे विलंब अथवा त्रास होणार नाही याची दक्षता संघटना तसेच संबंधीत औषध विक्रेत्यांनी घ्यावी.
या आदेशाचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, पोलीस अधिक्षक, हिंगोली, अधिक्षक, राजय उत्पादन शुल्क, हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा हिंगोली, सहा. आयुक्त अन्न्‍ व औषध प्रशासन, परभणी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इ. असणार आहे.
वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****



कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व्हीआरआरटी
पथकामार्फत 11 हजार 302 नागरिकांची तपासणी

          हिंगोली,दि.25:आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये हिंगोली जिल्ह्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशातंर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असून तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळुन येण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्याकरीता कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु नये,व  संशयित रुग्णामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवु नये, यासाठी बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम पातळीवर प्रत्येक गावनिहाय व्हीआरआरटी (Village Rapid Response Team ) पथकाची स्थापना  करण्यात आली आहे. या व्हीआरआरटी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती, कृषी सहायक, पोलीस पाटील आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांचे सयुंक्त पथक स्थापन करुन त्यांच्यामार्फत गावामध्ये-गावाबाहेर गावावरुन आलेल्या किंवा येणाऱ्या प्रवाशांची पथकामार्फत नोंद घेण्यात येत असून, विहीत नमुन्यातील (Self Assessment Form) भरुन कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांच्यामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
            जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या व्हीआरआरटी (Village Rapid Response Team) पथकामार्फत बाहेर गावावरुन आलेल्या एकुण 11 हजार 302 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून व तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दि. 15 मार्च रोजी कळमनुरी तालूक्यात 21 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून व तपासणी करण्यात आली आहे. तर दि. 16 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 07, वसमत तालूक्यात 19, कळमनुरी तालूक्यात 149 आणि औंढा तालूक्यात 21, दि. 17 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 08, वसमत तालूक्यात 125, कळमनुरी तालूक्यात 137, सेनगाव तालूक्यात 09 आणि औंढा तालूक्यात 59, दि. 18 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 26, वसमत तालूक्यात 135, कळमनुरी तालूक्यात 275, सेनगाव तालूक्यात 13 आणि औंढा तालूक्यात 89, दि. 19 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 02, वसमत तालूक्यात 174, कळमनुरी तालूक्यात 223, सेनगाव तालूक्यात 11 आणि औंढा तालूक्यात 149, दि. 20 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 03, वसमत तालूक्यात 167, कळमनुरी तालूक्यात 404, सेनगाव तालूक्यात 282 आणि औंढा तालूक्यात 138, दि. 21 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 51, वसमत तालूक्यात 356, कळमनुरी तालूक्यात 435, सेनगाव तालूक्यात 198 आणि औंढा तालूक्यात 215, दि. 22 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 381, वसमत तालूक्यात 265, कळमनुरी तालूक्यात 612, सेनगाव तालूक्यात 296 आणि औंढा तालूक्यात 359, दि. 23 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 161, वसमत तालूक्यात 487, कळमनुरी तालूक्यात 450, सेनगाव तालूक्यात 363 आणि औंढा तालूक्यात 508, दि. 24 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 270, वसमत तालूक्यात 646, कळमनुरी तालूक्यात 477, सेनगाव तालूक्यात 289 आणि औंढा तालूक्यात 286 तर आज दि. 25 मार्च रोजी हिंगोली तालूक्यात 244, वसमत तालूक्यात 255, कळमनुरी तालूक्यात 348, सेनगाव तालूक्यात 383 आणि औंढा तालूक्यात 321 असे एकुण 11 हजार 302 प्रवाशी नागरिकांची नोंद घेवून प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. 
तसेच जिल्ह्यात आलेल्या प्रवाशाना सर्दी, ताप, खोकला सदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य उपकेंद्राकडे कळवून तात्काळ उपकेंद्रात पाठविण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यातून आलेल्यांचा शोध घेणे, तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस (Home Quarantine) घरामध्येच विलगीकरण करण्यात करणे व प्रवाशी दररोज घराबाहेर पडणार नाही याची या पथकाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याकरीता सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून सदर कक्ष 24x7 सुरु राहणार आहे. सनियंत्रण समितीकडुन माहिती प्राप्त करुन घेणेसाठी 02456-221450 / 02456-223086 / 02456-224117 / 9822335273 या क्रमांकाचा वापर करण्यात यावा. तसेच जनतेने देखील त्यांच्या तक्रारी निवेदने याच क्रमांकावर नोंदवावी.

****



हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 10 नागरिकांना होम क्वॉरंनटाईन

            हिंगोली दि.25: कोरोना पार्श्वभूमीवर संशयीत रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली व अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत ग्रामिण रुग्णालय, आराखाडा बाळापूर, सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये कुठलाही संशयीत रुग्ण दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात परदेशातून फिलीपीन्स येथुन-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01, सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकुण 10 नागरिक आले आहेत. या सर्व नागरिकांना होम क्वॉरंनटाईन (घरात विलगीकरण) करण्यात आले आहे. होम क्वॉरंनटाईन मधील नागरिकांच्या हातावर होम क्वॉरंनटाईनचा शिक्का मारुन त्यांना 14 दिवस घरातच थांबण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रॅपिड ॲक्शन टिममार्फत त्यांची दररोज विचारपूस करण्यात येत असून, या सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची काही लक्षणे आढळल्यास त्यांना रॅपिड ॲक्शन टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
****



घरीच रहा-आरोग्याची काळजी घ्या
हिंगोली पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 25: कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच रहावे, अनावश्यक कारणांसाठी बाहेर निघू नये. आपल्या व आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हिंगोली जिल्ह्यांच्या पालकमंत्री तथा शालेय
शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
            हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागास तसे कळवावे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारपणाचे लक्षण दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. घरीच राहणाऱ्यांनी देखील आपले हाथ थोड्या- थोड्या वेळाने स्वच्छ धुवावे. स्वत:च योग्य ती काळजी घेऊन कोरोना सारख्या आजारापासून आपला बचाव करावा असेही त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.
****

24 March, 2020



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजीविक्रेते आणि
किराणा माल विक्रेत्यांकरीता 144 अन्वये मनाई आदेश
हिंगोली,दि.24:  जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात तसेच महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. त्‍याशिवाय भारत सरकार आरोग्‍य मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य मंत्रालय यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत असल्‍याची माझी खात्री झालेली आहे. त्‍याकरिता तात्‍काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खालील तरतुदींच्‍या अनुषंगाने जनतेस, खालील व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांना उद्देशून आदेश काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील नागरी भागासाठी फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 दि. 31 मार्च , 2020 पर्यंत जमावबंदी आदेश लागू केले होते राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. परंतू सद्यपरिस्थीती विचारात घेता हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही सदरील आदेश लागु करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्‍वये जमावबंदीचे आदेश दि. 23 मार्च, 2020 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 31 मार्च, 2020 च्या 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात लागू केले आहेत.
सद्यपरिस्थीती विचारात घेता अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  गर्दी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या संपुर्ण भागामध्ये दि. 23 मार्च, 2020 रोजीच्या आदेशात नमुद केलेल्या बाबी कायम ठेवुन  भाजीपाला व किराणामाल विक्रीसाठी खालीलप्रमाणे आदेश लागु करण्यात येत आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीमंडीत भाजीपाल्याची विक्री न करता संबंधित तालुक्याचे तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी  ठरवुन दिलेल्या  ठिकाणी खालीलप्रमाणे नमुद दिवशी व वेळी भाजीपाला विक्री करु शकणार आहेत. तसेच संबधीत मुख्याधिकारी यांनी ओळखपत्र देण्याची कार्यवाही करावी. भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एक मिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत भाजीपाला विक्रेत्यांनी घ्यावी. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. तसेच किराणामाल विक्रेत्यांनी देखील खालील नमुद दिवशी व वेळेतच किराणामालाची विक्री करावी. माल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहाकामध्ये एकमिटरचे अंतर राहील यांची दक्षता संबधीत किराणामाल विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.
अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
25/03/2020
बुधवार

सकाळी 10.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
27/03/2020
शुक्रवार
3
29/03/2020
रविवार
4
31/03/2020
मंगळवार
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सं‍हिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्त अधिकारानुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.      ****