18 March, 2020

शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु ठेवाव्यात - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु ठेवाव्यात
-      जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
             हिंगोली,दि.18: महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये दि. 31 मार्च, 2020 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने सदर दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ येथील शाखा दिनांक 31 मार्च, 2020 रोजी उशिरापर्यंत रात्री 23.00 पर्यंत शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी सुरु ठेवावेत, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशित केले आहे.
****

No comments: