कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर सनियंत्रण कक्षाची स्थापना
हिंगोली,
दि.23: आंतरराष्ट्रीय स्तरावर
व देशातंर्गत करोना विषाणु संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन
व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे
कोरोना विषाणुचे संशयीत रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळुन आल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या
संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ उपाय योजना आखणे आवश्यक आहे. संशयित रुग्णामुळे
आपत्तीजनक परिस्थिती उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे आवश्यक असल्याने सनियंत्रण
अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष
तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सनियंत्रण
कक्षाची स्थापना केली असून, याकरीता अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
अ.क्र.
|
अधिकारी/कर्मचारी
यांचे नाव ,पदनाम
|
पार
पाडावयाच्या कामाचे स्वरुप
|
1
|
1)
श्री. राजेद्र.गळगे,नायब
तहसिलदार जि.अ.का, हिंगोली.
2)
श्री. मधुकर
खंडागळे नायब तहलिसदार उप. वि.अ.का., हिंगोली.
3)
श्री. रोहित
कंजे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जि.अ.का, हिंगोली.
4) श्रीमती के.एम.भिसे अ.का जि.अ.का, हिंगोली.
5)
श्री. धनराज
निमजे लिपीक जि.अ.का, हिंगोली.
6)
श्री. रामप्रसाद
चव्हाण लिपीक जि.अ.का, हिंगोली.
7)
श्री. संजय
पाटील लिपीक जि.अ.का, हिंगोली.
|
1) नियुक्त करण्यात आलेल्या सनियंत्रण अधिकाऱ्याकडुन
वेळोवेळी माहिती संकलीत करुन घेऊन वरिष्ठांना
सादर करणे.
2) केद्र शासन, राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडुनप्राप्त आदेश सर्व
सबंधित विभाग/अधिकारी यांना कळविणे व आदेशाची अमलबंजावणी होते किंवा नाही याचा पाठपुरावा
करणे.
3) जिल्ह्यातील संशयित / बाहेर गावावरुन आलेल्या रुग्णांची माहिती VRRT (Village Rapid
Response Team) व आरोग्य उपकेंद्रास कळविणे.
|
2.
|
1) श्री. अरुण सुर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी,
हिंगोली
|
1) सोशल, प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या बातम्याची
पडताळणी करणे. आवश्यक निवेदने संबधीत विभागाकडुन घेणे दैनंदीन अहवाल प्रेसनोट स्वरुपात
प्रसिध्दीस देणे.
|
सनियंत्रण कक्ष 24x7 सुरु राहणार आहे.
सनियंत्रण समितीकडुन माहिती प्राप्त करुन घेणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या 02456-221450 / या दुरध्वनी क्रमांकाचा वापर करण्यात यावा. तसेच
जनतेने देखील त्यांच्या तक्रारी निवेदने याच क्रमांकावर नोंदवावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment