17 March, 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन


             कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात
गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

             हिंगोली,दि.17: शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी       शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगतांच्या भेटी दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. अभ्यांगत/नागरिकांना आपल्या कामाबाबत काही पत्रव्यवहार करावयाचा असल्यास त्यांनी संबंधीत कार्यालयास ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने पत्रव्यवहार करावा अथवा संपर्क साधावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी जास्तीत-जास्त कार्यालयीन कामकाज हे ई-मेल, दूरध्वनी व इतर तत्सम मार्गाने करावे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणाने कार्यालयात किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दी जमणार नाही याकरीता आवश्यक ते सर्व उपाय करावेत.
        कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या आदेशाची अवज्ञा केल्यास भारतीय दंडसंहिता  1860 (45) च्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. तसेच इतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशित केले आहे.
****
     



No comments: