27 March, 2020



अत्यावश्यक सेवा व वस्तुंची वाहतुकीसाठी वाहतूक
परवाना काढण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

हिंगोली दि.27: राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालय, हिंगोली येथे 24x7  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षास संकर्प साधण्यासाठी संपर्क क्रमांक 9021484105 असा आहे.     
अत्यावश्यक सेवा वस्तुंची वाहतूक करण्यासाठी या कार्यालयामार्फत वाहतूक परवाना जारी केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व माल वाहतूकदारांनी त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच संचारबंदीमुळे आपले अर्ज या कार्यालयाच्या mh38@mahatranscom.in या ई-मेल वर वाहन क्रमांक नमुद करुन वाहनाचे कागदपत्र सादर करुन अर्ज केल्यास ई-मेलद्वारे प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****


No comments: