बी.एस. चार मानकांच्या वाहनांची नोंदणी बंद होणार
हिंगोली, दि.03: वाहनांसाठीची प्रदुषण मानके बी.एस. चार ची नोंदणी दिनांक 31 मार्च
2020 नंतर बंद केली जातील. बी. एस. चार
वाहन काही कारणास्तव नोंदणी करावयाचे प्रलंबित असले जसे की, वित्तदात्याकडील थकीत
प्रकरण वाहन मालकाचे आजारपण, वाहन मालकाचा अपघात इत्यादी तर अशा वाहनाची नोंदणी
दिनांक 20 मार्च 2020 पूर्वी पूर्ण करुन घ्यावी, संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही
परिस्थितीत दिनांक 31 मार्च 2020 नंतर फक्त बी.एस. सहा मानकांच्या वाहनांची नोंदणी
करता येणार आहे.
दिनांक 25 मार्च
रोजी गुढी पाडवा आहे तत्पूर्वी किमान 6 ते 7 दिवस अगोदर वाहनाची सर्व पूर्तता जसे शुल्क, कर इत्यादी भरणा पूर्ण करुन घ्यावी जेणे करुन एचएसआरपी नंबर
प्लेट बसवून वितरक गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.
मा. सर्वोच्च
न्यायालयाचे आदेश पाहता व संगणकीय प्रणालीतील बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालक
याची कोणत्याही प्रकारची बी.एस. चार मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार
केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment