31 March, 2020

कोरोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा,नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश




             हिंगोली,दि.31: शासनाने कोरोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
            कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे तसेच हजारो लोकांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 5 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह  दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देष दिले आहेत.
            हिंगोली जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
आदेश बहुसंख्य व्यक्तींपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालूका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.

****

No comments: