27 March, 2020



जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास कारवाई
- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड 

   हिंगोली,दि.27: जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वितरणात कुठलाही अडथळा येवू देणार नाही तथापी, वितरक, विक्रेत्यांनीही अतिरिक्त दर आकारु नये. अशा स्थितीत काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास  प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र तशी वेळ येऊ नये, ही वेळ देश व समाजाप्रती जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची वेळ आहे. या काळात सर्वांचे सहाकार्य आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.             
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे विक्रेता, वितरण साखळी, उत्पादक, वाहतूकदार व त्यांचा साहाय्यकरी व्यवसायीकाकडून नागरिकांना सेवा पुरविण्यात कुठलाही अडथळा येणार नाही. यासाठी प्रशासनाने संपुर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

****

No comments: