करोनाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व शाळा-महाविद्यालये
31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
हिंगोली,दि.17: शासनाने करोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ
रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनां 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील
तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोरोनाच्या
प्रार्दूभावामुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे तसेच हजारो लोकांना करोना
रोगाची लागण झाल्याचे इलेक्ट्रीक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून
निदर्शनास येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी दि. 5 मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये करोना व्हायरस प्रतिबंध आराखडा
तयार केला आहे. त्याप्रमाणे करोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील
सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व
प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था म्हणजेच महाराष्ट्र
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था या दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे
निर्देष दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना
रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवीत हानी होऊ नये या दृष्टीने सु रक्षिततेची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र
पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व
शैक्षणिक संस्था दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित
करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील सर्व
नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील 10 वी व 12 वी च्या परीक्षा तसेच
विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असाही निर्णय
घेण्यात आला आहे. तसेच आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना संपर्कात येणार नाही
यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना ही देण्यात येत आहेत.
हा आदेश बहुसंख्य
व्यक्तींपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय
पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन यांच्या
कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.
****
No comments:
Post a Comment