18 March, 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
             हिंगोली,दि.18: शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2018-2019 व 2019-20 या वर्षासाठी प्रदान करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
            या पुरस्काराचे स्वरुप राज्यस्तरीय पुरस्कार रु. 1 लाख 1 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ तर  विभागस्तरीय पुरस्कार 25 हजार 2 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आणि जिल्हास्तरीय पुरस्कार 10 हजार 1 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात येतील.
            जिल्ह्यातील इच्छुक पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात दि. 29 मार्च, 2020 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली-431513 येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
****

No comments: