सुट्टीच्या दिवशी
वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार
हिंगोली, दि.11: मार्च महिन्यातील दिनांक
25 मार्च रोजी गुढीपाडवा हा उत्सव तसेच दिनांक 21,22 मार्च व 28, 29 मार्च रोजी येणाऱ्या
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे.
सदर दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा
याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली वरील सर्व तारखांना सुरु राहणार आहेत. त्यामुळे या
सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार आहे.
सर्व वाहन विक्रेते तसेच वाहन खरेदी करणारे यांनी
सदर दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे वाहन नोंदणी व कर भरणा करण्याचे
कामकाज करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment