करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
गर्दी न करता
ई-मेलच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.17: चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेला करोना विषाणुचा प्रसार जगभरात जागतिक
आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 90 देशांमधील बहुतांश लोकांमध्ये पसरलेला आहे.
करोना हे विषाणुच्या एका समुहाचे नाव असून 31 डिसेंबर, 2019 रोजी चीन देशातील
वुहान शहरात नवीन करोना विषाणुचा उद्रेक
घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे
रुग्ण आढळले आहेत. चीनच्या बाहेर भारतासह श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड, दक्षिण
कोरीया, अमेरिका, फ्रान्स, हराण, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया,
स्पेन, डेन्मार्क इत्यादी देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. भारतात परदेशी नागरिकांसह या आजारांचे रुग्ण आढळून आले
आहेत.
करोना विषाणू आजाराचे लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत आहे, सर्दी,
खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, करोना विषाणुमुळे होणारे आजार नेमका
कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी सर्व सर्वसाधारणपणे हा आजार शिंकण्या, खोकल्यातून ते थेंब बाहेर
पडतात त्यातून पसरतो. तसेच वय वर्ष 50
पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, गरोदर माता, लहानबालके, मधुमेह, कॅन्सर व
आजारी असणाऱ्या व्यक्तींना विशेष काळजी
घेणे आवश्यक आहे.
तसेच शासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक
कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित
केलेली आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5 मार्च रोजीच्या पत्रान्वये करोना
व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कटाक्षाने अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात
आले आहे.
त्यामुळे दि. 17 ते 31 मार्च, 2020 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे
टाळावे व आपल्या कामाबाबत आपणास काही पत्रव्यवहार करावयाचा असल्यास जिल्हाधिकारी हिंगोली
यांचे ईमेल hincollector@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02456-221701 व निवासी
उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांचे ईमेल rdc.hingoli123@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02456-221450 यावर वरील कालावधीत पत्रव्यवहार करावा
अथवा संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment