हिंगोली,दि.31: शासनाने कोरोना विषाणुचा (कोवीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी
राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनां 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड
2,3, व 4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे
जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचे तसेच हजारो लोकांना कोरोना रोगाची लागण
झाल्याचे इलेक्ट्रीक मिडिया, सोशल मिडियाद्वारे व इतर माध्यमातून निदर्शनास येत
आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 5
मार्च, 2020 रोजीच्या पत्रान्वये कोरोना व्हायरस प्रतिबंध आराखडा तयार करण्यात आला
आहे. त्याप्रमाणे कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नगरपालीका, सर्व नगर
पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या या दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे
निर्देष देण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना
रोगाचा प्रादुर्भाव होवू नये, तसेच जिवीत हानी होवू नये या दृष्टीने सुरक्षिततेची
उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये जिल्ह्यातील सर्व
नगरपालीका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे
आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
आदेश
बहुसंख्य व्यक्तीपर्यंत पोहचणे हिताचे असल्याने हे आदेश सर्व उपविभागीय
दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस
स्टेशन यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी, असे
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.
****
No comments:
Post a Comment