हिंगोली जिल्ह्यात
कोरोनाचा एक संशयीत रुग्ण
हिंगोली दि.27: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना
संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात
कोरोना कोविड-19 आजाराचा एका संशयीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे कोरोना रुग्णांसाठी
तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरील व्यक्ती
ही डॉक्टर असून त्यांचे वय 30 वर्ष आहे. हा रुग्ण शासकीय स्त्री रुग्णालय, अकोला
येथे कार्यरत असून सद्या हिंगोलीत वास्तव्याला आहे. या रुग्णांस दि. 24 मार्च,
2020 पासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आल्याने त्यास आय.सी.एम.आर. च्या
मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचा थ्रोट
स्वॅब पुणे येथील एन.आय.व्ही. संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील दोन
दिवसांमध्ये त्यांच्या अहवाल येणे अपेक्षीत असून, सदरील संशयीत रुग्णावर जिल्हा
सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये
औषधोपचार करण्यात येत आहे.
तसेच जिल्ह्यात
आतापर्यंत परदेशातून फिलीपीन्स येथुन-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01,
सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकुण 10 नागरिक आले आहेत. अत्यंत
महत्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा
वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. किशोर श्रीवास यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment