25 March, 2020



हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 10 नागरिकांना होम क्वॉरंनटाईन

            हिंगोली दि.25: कोरोना पार्श्वभूमीवर संशयीत रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली व अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत ग्रामिण रुग्णालय, आराखाडा बाळापूर, सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये कुठलाही संशयीत रुग्ण दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात परदेशातून फिलीपीन्स येथुन-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01, सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकुण 10 नागरिक आले आहेत. या सर्व नागरिकांना होम क्वॉरंनटाईन (घरात विलगीकरण) करण्यात आले आहे. होम क्वॉरंनटाईन मधील नागरिकांच्या हातावर होम क्वॉरंनटाईनचा शिक्का मारुन त्यांना 14 दिवस घरातच थांबण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रॅपिड ॲक्शन टिममार्फत त्यांची दररोज विचारपूस करण्यात येत असून, या सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची काही लक्षणे आढळल्यास त्यांना रॅपिड ॲक्शन टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
****

No comments: