कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर शिकाऊ
अनुज्ञप्तीसाठीच्या नियोजित भेटी पुनर्निर्धारित करण्यात येणार
-उप प्रोदशिक परिवहन अधिकारी
हिंगोली,दि.18: राज्यात
कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यास्तव प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य
शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात
विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणात अभ्यागतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते. त्यामुळे कोरोना विषाणू प्रसार
होण्याची संभावना कमी करण्यासाठी दि. 31 मार्च पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी घेतलेल्या
अर्जदारांचे नियोजित भेटी (अपॉईमेंट) पुढील महिन्यामध्ये पुनर्निर्धारित (रिशेड्युल)
करण्यात येईल व ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी संपणार
आहे अशा अर्जदारांची पक्या अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच सर्व पक्की
अनुज्ञप्तीचे अपॉईंमेंट पुढील महिन्यामध्ये पुनर्निर्धारित (रिशेड्युल) करण्यात येणार
आहे.
त्यामुळे
दि. 31 मार्च, 2020 पर्यंत फक्त अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता
प्रमाणपत्राचे नुतनीकरण, परवाना संबंधी कामेच करण्यात येणार आहेत. तसेच नवीन वाहन नोंदणीचे
सर्व काम सुरु राहणार आहेत. इतर कामे जसे वाहन
हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद इत्यादी कामे करण्यात येणार नाहीत. असे उप प्रोदशिक परिवहन
अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment