हिंगोली, दि.22: राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने आपातकालीन परिस्थिती
निर्माण झाली आहे. यावर नियंत्रणकरीता उपाययोजनाची
आवश्यकता निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील नागरी भागासाठी
(नगर परीषद व नगर पंचायत) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे
कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश लागू केले आहेत. राज्यात
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला
आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघ करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरी भागातील (नगर परिषद व नगर पंचायत) खाजगी व
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व
प्रकारचे कार्यक्रम, समारंभ,
सांस्कृतिक कार्यक्रम, सण, सत्सव, उरुस, जत्रा,
मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्पर्धा, तसेच खाजगी व सार्वजनिक
ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती
एकत्र येतील असे सर्व प्रकारची कृत्य जसे कार्यशाळा,
कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशातंर्गत व परदेशी सहली इ. यांचे
आयोजनास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढून दि. 22
मार्च, 2020 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून ते दि. 31 मार्च, 2020 चे 24.00 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील नागरी भागातील (नगर परीषद व
नगर पंचायत) राहणाऱ्या जनतेसाठी जमावबंदी आदेश लागू केले आहे. या आदेशान्वये सर्व नागरीकांना अनावश्यकरित्या
सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई करीत आहे.
तसेच
अशा खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा
पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व दुकाने/सेवा आस्थापना, उपहार
गृहे/खाद्यगृहे/खानावळ, शॉपींग कॉम्लेक्स, मॉल्स, सूपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब क्रीडांगणे,मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमा गृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये,
खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय या कालावधीत बंद राहतील.
तसेच सदरचे आदेश
पुढील बाबीकरीता लागु होणार नाहीत. शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी
महामंडळाचे उपक्रम/अस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती,
रुग्णालय, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय (अॅलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी), नर्सिग कॉलेज, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, परिवहन थांबे व स्थानके,
रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप, पुर्वनियोजीत विवाह समारंभ (कमाल 50 व्यक्तींपुरती
मर्यादित) अंत्यविधी (कमाल 50 व्यक्तींपुरती मर्यादित), अत्यावश्यक किराणा
समान, दुध/दुग्धोत्पादने, फळे
व भाजीपाला, औषधालये, जीवनावश्यक
वस्तु विक्रीची ठिकाणे. उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेवुन खाद्यपदार्थ
बनविणे, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गानी
विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास
असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेवुन रेस्टॉरंटमध्ये
खाद्यपदार्थ बनवुन देण्यास परवानगी राहिल. ज्या आस्थापना (उदा. माहिती व
तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या (Critical-National
& International Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे. व
सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येवू शकते असे
सर्व संबंधित उपक्रम कार्यन्वित राहु शकतील. (परंतू यादृष्टीने सदर आस्थापना
कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेषरित्या
कळविणे बंधनकारक राहणार आहे.) प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टि.व्ही. न्युज चॅनेल इ.)
कार्यालय, घरपोच देण्यात येणाऱ्या सेवा उदा. अॅमेझॉन, फ्लीपकार्ट,
इ. सुरु राहतील.
सदर आदेशाचे उल्लघंन
करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक
तसेच आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापूर्वी स्वतंत्र
नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये
प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यातआलेला आहे. याबाबतची माहिती
प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे
सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment