घरीच रहा-आरोग्याची
काळजी घ्या
हिंगोली
पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 25: कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव वाढू नये
यासाठी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच रहावे, अनावश्यक कारणांसाठी बाहेर निघू नये. आपल्या व आपल्या
आजुबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हिंगोली जिल्ह्यांच्या पालकमंत्री तथा शालेय
शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी
केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा
पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच परदेशातून
आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागास तसे कळवावे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारपणाचे लक्षण दिसल्यास तातडीने
वैद्यकीय मदत घ्यावी. घरीच राहणाऱ्यांनी देखील आपले हाथ थोड्या- थोड्या वेळाने
स्वच्छ धुवावे. स्वत:च योग्य ती काळजी घेऊन कोरोना सारख्या आजारापासून आपला बचाव
करावा असेही त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.
****
No comments:
Post a Comment