कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
-पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
हिंगोली,दि.27: कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती मध्ये उपलब्ध
असून, याशिवाय देखील निधी लागल्यास तो निधी देखील उपलब्ध करुन देणार असल्याचे पालकमंत्री
वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणानी अधिक सक्षम व्हावे यासाठी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या
मागणीनूसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य
केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आरोग्य विषयक साधनसामुग्री, औषधी विषयक साहित्यासाठी
निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध
होण्याकरिता पालकमंत्री दररोज सकाळ-संध्याकाळ संबंधीत अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीवरुन
उपाययोजनाबाबत आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय
आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करुन
संभाव्य परिस्थितीशी मुकाबला करण्याकरीता सज्ज राहण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले
आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर पडू नये, अशी
विनंती करत काळजी घेवून सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री
वर्षाताई गायकवाड यांनी केले.
****
No comments:
Post a Comment