07 December, 2016

समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत
 जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीचे उद्दिष्ट
हिंगोली, दि. 7 : समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीसह इतर वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या कामाचे उद्दिष्ट महात्मा गांधी नरेगा अंतर्गत प्राप्त झालेले आहे.

सिंचन विहिरी संख्या
शेततळे (संख्या)
वर्मी कंपोस्ट टाके (संख्या)
नाडेप टाके (संख्या)
फळबाग लागवड (हेक्टर)
शौचालय बांधकाम (संख्या)
शोषखड्डे (संख्या)
गाव तलाव / पारंपारीक / पाणी साठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे / जलसंधारणाची कामे (संख्या)
रोपे निर्मिती (संख्या)
वृक्ष लागवड (संख्या)
ग्राम सबलीकरण (संख्या)
10000
5600
2200
2200
180
2200
2200
1100
2200000
220000
1600

सदर वैयक्तिक लाभांतर्गत घ्यावयाच्या 07 प्रकारच्या कामांच्या लाभार्थी निवडीसाठी व सार्वजनिक लाभाच्या 4 प्रकारच्या कामांच्या अंमलबजावणीकरिता ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन करून त्यामध्ये ग्रामसभेने निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीने भरून घ्यावयाचे आहेत. ग्रामपांचायतीने सदर प्राप्त प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पंचायत समिती / तहसील कार्यालय, संबंधीत यंत्रणाकडे सादर करावयाचे आहेत.
तांत्रिक  मान्यता प्राप्त प्रस्तावाना तहसीलदार / गट विकास अधिकारी पंचायत समिती / यंत्रणांचे सक्षम अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावयाची आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांची संबंधीत तांत्रिक अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय आखणी करून व प्रत्यक्ष कामास सुरूवात करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत सर्व कामे पुर्ण करून काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन करावयाची आहे.
वैयक्तिक सिंचन विहिर मंजुरीसाठी विशेष ग्रामसभेमध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीव्दारे भरुन घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीव्दारे लाभधारकाची निवड करताना केंद्रशासनाने विहित केल्याप्रमाणे लाभार्थी संवर्गनिहाय मंजुरी करण्यात येणार आहे. सिंचन विहिरींच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे पारदर्शकरित्या करण्यात येणार असून यासाठी लाभार्थ्यांनी दलालामार्फत, एजंटामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आमिषांना, भुलथापांना बळी पडु नये. सर्व इच्छूक नागरिक, शेतकरी यांनी तात्काळ त्यांच्या संबंधीत ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: