बहुजन संघर्ष मुक मोर्चामुळे जड वाहतुकीच्या मार्गात बदल
हिंगोली, दि. 14 :- बहुजन समाजातर्फे भव्य बहुजन संघर्ष मुक
मोर्चा आयोजित केल्यामुळे हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी
होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 15 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 9.00 ते 16.00
वाजता पावेतो औंढा कडून येणारी जड वाहतुक व अकोला व नांदेडकडून येणाऱ्या जड
वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
मुंबई
पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) खालील प्रमाणे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले
आहे.
1) औंढा ना. कडुन हिंगोली मार्गे वाशिम, अकोलाकडे जाणारी जड
वाहतुक हि औंढा, पिंपळदरी, नांदापूर, उमरा फाटा, उगम, खटकाळी, अकोला बायपास मार्गे
वाशिम, अकोलाकडे जातील. 2) औंढा ना. कडून कळमनुरी, आखाडा बाळापूर कडे जाणारी औंढा,
पिंपळदरी, नांदापूर, उमरा फाटा, उगम मार्गे कळमनुरी बाळापूर कडे जातील. 3) अकोला,
वाशिम कडून हिंगोली मार्गे औंढा ना. कडे जाणारी जड वाहतुक हि अकोला बायपास,
खटकाळी, उगम, उमरा फाटा, नांदापूर, पिंपळदरी, औंढा मार्गे पुढे अशी जाईल. 4) आखाडा
बाळापूर कळमनुरी कडून हिंगोली मार्गे औंढा ना. कडे जाणारी जड वाहतुक हि कळमनुरी,
उगम, उमरा फाटा, नांदापूर, पिंपळदरी, औंढा ना. मार्गे पुढे अशी जाईल, असे
जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment