भारत सरकार
शिष्यवृत्ती संदर्भात जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक
हिंगोली,दि.21: भारत
सरकार शिष्यवृत्ती संदर्भात दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केलेली असून सदर
बैठकीमध्ये सन 2016-17 च्या भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा
शुल्क योजनेचा महाविद्यालयनिहाय भरलेल्या अर्जांचा तसेच सन 2014-15 व 2015-16 च्या
प्रलंबित प्रकरणाबाबत आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेसंदर्भात
आवश्यक असलेली संपुर्ण माहिती देण्यात येऊन महाविद्यालयनिहाय असलेल्या अडचणी लेखी
स्वरूपात स्विकारण्यात येणार आहेत. आणि सन 2015-16 पर्यंत मंजूर झालेल्या
शिष्यवृत्ती व शिक्षण फी व परीक्षा फी या योजनांच्या या कार्यालयामध्ये असलेल्या
अर्जांच्या मुळ प्रती महाविद्यालयास हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
तरी
दि. 29 डिसेंबर, 2016 रोजी दु. 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे
बैठकीसाठी ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शिष्यवृत्ती संदर्भात काम पहाणारे
कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाज कल्याण
विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी
जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment