मुद्रा बँक योजनेतंर्गत विद्यार्थी-विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज
तात्काळ मंजूर करावे
*जिल्ह्यातील 1265
लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख कर्ज वितरण*
---जिल्हाधिकारी
अनिल भंडारी
हिंगोली, दि.22: केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक
योजनेतंर्गत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या भविष्याचा विचार
संवेदनशीलरित्या करुन सर्व बँक व्यवस्थापकांनी तात्काळ शैक्षणिक कर्ज मंजूर
करण्याच्या सूचना मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल
भंडारी यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार रामराव
वडकुते, जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोद्दील
कुरेशी, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान आणि जिल्हा नियोजन अधिकारी
विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी भंडारी पुढे म्हणाले की,
जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु-30, किशोर
-20 व तरुण-10 याप्रमाणे गटनिहाय मुद्रा
बँक योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून, काही बँकानी यामध्ये
चांगले काम केल आहे. इतर बँकांनी देखील त्यांना ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण
करावे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देखील मुद्रा बँक योजनेतंर्गत समावेश
करण्यात आला असून त्यांनी देखील कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करावे.
तसेच मुद्रा बँक अंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांचे
नामंजूर केलेल्या अर्जाबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक
यांच्यामार्फत समितीकडे सादर करावीत. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना
या योजनेचा लाभ देवून नवीन उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयन्त करावा अशा सूचना
ही श्री. भंडारी यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय
उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा
बँक योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील शिशु , किशोर आणि तरुण या गटातील एकूण 1 हजार
265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख रुपय कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती
जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश मदान यांनी यावेळी दिली.
अलाहाबाद बँक -24 लाभार्थ्यांना 34 लाख , बँक ऑफ बडोदा -37 लाभार्थ्यांना 35 लाख , बँक
ऑफ इंडिया -93 लाभार्थ्यांना 48 लाख , बँक ऑफ महाराष्ट्र - 76 लाभार्थ्यांना 83
लाख, कॅनडा बँक 24 लाभार्थ्यांना 48 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया -10 लाभार्थ्यांना 5 लाख,
देना बँक -02 लाभार्थ्यांना 1 लाख, आयडीबीआय बँक - 18 लाभार्थ्यांना 60 लाख, ओरियटंल
बँक ऑफ कॉमर्स-03 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँक-01 लाभार्थ्यांना 05
लाख, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-481 लाभार्थ्यांना 966
लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया-162
लाभार्थ्यांना 246 लाख, सिंडिकेट बँक -57 लाभार्थ्यांना 72 लाख, युको
बँक - 09 लाभार्थ्यांना 10 लाख, युनियन
बँक ऑफ इंडिया -70 लाभार्थ्यांना 56 लाख, ॲक्सिस बँक -09 लाभार्थ्यांना 2
लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक- 188
लाभार्थ्यांना 296 लाख, असे एकूण 1265 लाभार्थ्यांना 19 कोटी 68 लाख 29 हजार रुपये
मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांना कर्ज वितरण केले आहे.
यावेळी बैठकीस समितीचे शासकीय अशासकीय
सदस्यांसह बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती .
***
No comments:
Post a Comment