कृषि निविष्ठाची खरेदी आरटीजीएस/एनईएफटी व्दारे करण्याची
काळाची गरज
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 16 :- पाचशे हजारच्या नोटबंदी
मुळे शेतकरी, व्यापारी व सामान्य जनतेनी आरटीजीएस/एनईएफटी चा वापर करून खरेदी
करण्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. जिल्हा नियोजन सभागृहात कृषि
निविष्ठा खरेदीची रक्कम ऑनलाईन करण्याविषयीच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. पी.
लोंढे, जिल्हा उपनिबंधक श्री. निकम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. डुबल,
आदिंसह बँकेतील अधिकारी / कर्मचारी, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
श्री. भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांना चलनी नोटाबरोबरच
रोखरहित व्यवहार करण्यासाठी आरटीजीएस प्रणालीचा वापर करून कृषि निविष्ठा खरेदी
करण्याचे सांगितले. बँकेतील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँकेत असणाऱ्या
आरटीजीएसच्या नमुन्याविषयी माहिती देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याची निर्देश
त्यांनी दिले. तसेच रोखरहित व्यवहार करण्यासाठी डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन
देण्यासाठी निती आयोगाने भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजी-धन-व्यापारी योजना जाहीर
केल्या आहेत. याव्दारे वैयक्तिक खर्चासाठी डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहक आणि
व्यापाऱ्याला बक्षीस दिले जाणार आहे. डिजीटल व्यवहाराच्या क्षेत्रात गरीब,
मध्यमवर्ग आणि लहान व्यापाऱ्यांना आणण्याच्या दृष्टीने या योजना आखण्यात आल्या
असल्याची माहिती ही दिली.
पीओएस
(POS) : शहरी भागात हे अगदी सामान्य आहे. POS म्हणजे 'पॉइंट ऑफ सेल' म्हणजेच
'विक्रीचे ठिकाण'. खातेधारकांनी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट्स
करण्याची ही सुविधा आहे. त्यासाठी खातेधारकांना बँक खाते असलेल्या बँकेतून 'डेबिट
कार्ड' मिळवा किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करून पिन सेट करा आणि लक्षातही ठेवा.
तसेच खातेधारकांचे कार्ड स्वाइप करून जी रक्कम भरायची आहे ती टाइप करा. खातेधारकांचा
PIN टाकून भरता येईल.
त्याबरोबरच खातेधारकांना बँक खाते
उघडल्यानंतर आपोआप डेबिट कार्ड मिळूनच जाते.
ते कार्ड पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठीही जगभरातील कोणत्याही एटीएममध्ये
वापरता येऊन ऑनलाइन व्यवहारासाठीही कार्ड वापरले जाऊ शकते
आधार
सक्षम पेमेंट सिस्टीम (AEPS) : आधार कार्डद्वारे बँकिंग करू शकत असाल
तर मग आपल्या बँकेवर अवलंबून राहण्याची गरज नसून खातेधारकांचे आधार कार्ड बँक
खात्याशी जोडून घेऊन आधार नंबर लक्षात ठेऊन एक प्रत स्वतःजवळ ठेवण्याचे सांगितले. एका पेक्षा अधिक बँक खाती असल्यास आधार
कार्डशी जोडलेल्या बँकेचे खाते कोणते ते नीट लक्षात ठेऊन आधार बायोमेट्रिक्ससाठी रेकॉर्ड केले गेलेले खातेधारकांचे
फिंगरप्रिंट खरेदी-विक्री व्यवहारात ग्राह्य धरले जात असल्याची माहिती जिल्हा
अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान यांनी दिली.
त्याबरोबरच बाकी रकमेची (बॅलन्स)
चौकशी, कॅश काढणे, भरणे आणि आधार कार्ड-ते-आधार कार्ड फंड ट्रान्सफर सोपे होऊन
अधिकची नोंदणी गरजेची नाही. तसेच ग्रामीण भागात ही सुविधा उपयोगी पडू शकते, जिथे
बँकिंग प्रतिनिधींद्वारे व्यवहार केले जातात.
कृषि निविष्ठाविषयी झालेल्या
कार्यशाळेची माहिती देऊन श्री. लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.
*****
No comments:
Post a Comment