सामाजिक
न्याय विभगातील बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांनी नवोउपक्रम
म्हणुन बाहयस्त्रोत कर्मचारी यांची कार्यशाळा 21 डिसेंबर, 2016 रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथील सभागृहामध्ये संपन्न झाली.
सदर कार्यशाळेस सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
डॉ. सी. के. कुलाल, विशेष अधिकारी, (शा.नि.शा.) श्रीमती जी. डी. गुठ्ठे, समाज
कल्याण निरीक्षक टी. डी. भराड व विभागीय व्यवस्थापक श्री. कदम, बोराडे व चंदनशिवे तसेच
जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासीशाळेतील येथील बाह्यस्त्रोतद्वारे
नियुक्त बी. व्हि. जी. आणि क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी
जाणून घेण्यात आल्या. तसेच वस्तीगृहात निर्माण होणाऱ्या समस्या जाणून त्या
सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांचेकडून आवश्यक त्या सूचना
देण्यात आल्या. तसेच सदर कर्मचाऱ्यांना व्यक्तीमत्व विकास व कौशल्य विकास या बाबत
मार्गदर्शन करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment