10 December, 2016

जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते 
संचालनालय लेखा व कोषागारे विभागीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन

हिंगोलीदि.10:-  संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीमार्फत विभागीय व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 10 व 11 डिसेंबर, 2016 रोजी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर विभागीय क्रिडा स्पर्धेचे ज्योत प्रज्वलन करुन उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच उपस्थित मान्यवरांना देण्यात आली. यावेळी एन.सी.सी. पार्थ सैनिक, खेळाडू बँड मशाल आदिंनी मार्चपास मानवंदना देण्यात आली.  
विभागीय स्पर्धेमध्ये क्रिकेट, थ्रो बॉल शुटिंग (महिला),खो-खो (महिला), व्हालीबॉल शुटींग, टेबल टेनिस एकेरी (महिला ) , टेबल टेनिस दुहेरी (महिला), टेबल टेनिस एकेरी (पुरुष), टेबल टेनिस दुहेरी (पुरुष), बॅडमिंटन एकेरी (महिला), बॅडमिंटन दुहेरी (महिला), बॅडमिंटन एकेरी (पुरुष), बॅडमिंटन दुहेरी (पुरुष), कॅरम एकेरी (महिला) , कॅरम दुहेरी (महिला), कॅरम एकेरी (पुरुष) , कॅरम दुहेरी (पुरुष), बुध्दीबळ खुली स्पर्धा (मिश्र) आदी स्पर्धेत सहभाग कर्मचाऱ्यांनीदेखील सहभाग नोंदविला आहे. 
यावेळी प्र. जिल्हा पोलीस अधीक्षक  सचिन गुंजाळ, लेखा व कोषागारे औरंगाबाद विभाग, औरंगाबाद ल. मा. पाटील, स्थानिक निधी लेखारपरीक्षा औरंगाबादचे म. वि. वाघीरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. दे.का. हिवाळे, जिल्हा कोषागार अधिकारी तु.लि. भिसे, स्थानिक निधी लेखा परीक्षा हिंगोली सहाय्यक संचालक अ.अं. गावडे, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार आदि प्रमुख मान्यवरांची यावळी उपस्थिती होती.
****



No comments: