14 December, 2016

1 नोव्हेंबर, 2016 या अर्हता दिनांकावर आधारित
शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम नोंदणीस मुदतवाढ

          हिंगोली, दि. 14 :- भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर, 2016 या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नमुना-19 मधील दावे, नमुना-7 मधील हरकती व नमुना-8 आणि नमुना-8 अ मधील दुरूस्तीचे अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 19 डिसेंबर, 2016 पर्यंत वाढविण्यात आली असून, मतदार यादीची अंतीम प्रसिध्दी दि. 12 जानेवारी, 2017 रोजी करावयाची आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

***** 

No comments: