जिल्हा व
राज्यस्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे
आवाहन
हिंगोली, दि. 19 : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय
स्तरावर विविध विषयांत युवांनी पार पाडलेल्या भूमिका, योगदान यामुळे युवांची एक अव्दितीय समूह अशी ओळख समाजात निर्माण झालेली
आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 च्या अनुषंगाने धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने जिल्हा,
राज्य, राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील
युवक - युवती व स्वयंसेवी संस्थांना जिल्हा व राज्य युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात
येणार आहे.
जिल्हास्तरावरील पुरस्काराचे
स्वरूप युवक व युवतींसाठी रक्कम 10 हजार रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि
युवा संस्थेकरिता रक्कम 50 हजार (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे. राज्यस्तरावरील
पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी रक्कम 50 हजार रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह
आणि युवा संस्थेकरिता रक्कम 1 लाख रुपये (प्रत्येकी) गौरवपत्र, सन्मानचिन्ह असणार आहे.
सदरचा पुरस्कार 1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
अर्ज प्राप्त करून घेणे
व जमा करणेची अंतिम तारीख दि. 28 फेब्रुवारी, 2017 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा
विचार करण्यात येणार नाही. विहीत अर्ज पात्रतेचे निकष व अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment