अनुसुचित
जाती / जमातीतील
उद्योजकांना लघु उद्योजकांसाठी सुवर्णसंधी
हिंगोली,दि. 8 :- महाराष्ट्र शासनाच्या विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत अनुसुचित जाती
/ जमातीच्या पात्र उद्योजकांना खालील प्रोत्साहन देय करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
लाभार्थ्यांची खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
यामध्ये अनुसुचित जाती / जमातीच्या महाराष्ट्रातील रहिवाशी
असलेल्या उद्योजकांचे प्रोप्रायटर
लघु उद्योग किंवा 100 टक्के
भाग भांडवल असलेले भागिदारी / कंपनी सोसायटीद्वारे स्थापन केलेले
उद्योग, लघुउद्योग स्थापनेसाठी जमिनीची खरेदी, कंपनी / सोसायटी/ भागीदारी संस्था
यांची नोदणी लघु उद्योगांची नोंदणी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची उद्योग स्थापनेची परवानगी (Consent to Establish) यापैकी एक परिणामकारक
टप्पा दि.01 एप्रिल, 2013 नंतर
पुर्ण केलेला असावा.
सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास औद्योगिक प्रोत्साहन
अनुदान, भुखंड अनुदान : भुखंड खरेदी / भाडेपट्टा किंमतीवर
20 ते 30 टक्के (रुपये 5 ते 10 लाख पर्यंत) अनुदान विशेष भांडवल अनुदान, विशेष भांडवली अनुदान : भांडवली गुंतवणूकीवर
15 ते 30 टक्के (रु. 15 ते 30 लाख मर्यादेपर्यंत ) विशेष भांडवली अनुदान, वीज दर अनुदान : वीज दरावर रु. 1 ते 2 प्रति युनिट 5 वर्षाकरीता अनुदान, व्याज अनुदान : स्थावर मालमत्ता स्थापन करण्यासाठी बँक / वित्तीय संस्थेकडुन घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर 5 टक्केपर्यंत
व्याज अनुदान, विद्युत शुल्क
माफी, मुद्रांक माफी, इतर प्रोत्साहन प्राप्त होणार आहे.
वरील प्रोत्साहना शिवाय अनुसुचित जाती / जमातीच्या उद्योग समुहांना शासनाच्या उद्योग समुह विकास योजनेतंर्गत सामायिक सुविधा केंद्र
स्थापन करण्यासाठी तसेच अशा समुहांना रस्ते, पाणी, वीज
इ.पायाभुत सुविधासाठी अनुदान देण्यात येते.
वरीलप्रमाणे पात्र लघु उद्योजकांनी www.di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन
रजिस्ट्रेशन करावे आणि सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत (पीएसआय) अर्ज सादर करावा किंवा
पुढील माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे
आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment