जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे
आवाहन
हिंगोली, दि. 19 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत जिल्ह्यातील
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत
खेळाडू-2 (महिला-1, पुरुष-1) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-
1 यांच्या कार्याचे योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे
याकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र
स्मृतिचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये देण्यात येणार असून पुरस्काराचे वर्ष दि. 1
जूलै, 2015 ते दि. 30 जुन, 2016 या कालावधीतील राहील. तरी जिल्ह्यातील उत्कृष्ठ कामगीरी
करणारे खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्ता यांनी दि. 26 डिसेंबर, 2016 या कालावधीत
कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार
यांनी केले आहे.
गुणवंत खेळाडू ची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय
अजिंक्य स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगत पुर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीयस्तरावरील
वरीष्ठ/कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला राष्ट्रीय स्तरीवरील कामगीरी लक्षात घेण्यात
येईल यापैकी उत्कृष्ठ ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगीरीचा विचार करण्यात येईल.
गुणवंत क्रीडा
मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य
केले असले पाहिजे व त्यांचे वयाची 30 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या
जिल्ह्यातील खेळाडूचीच कामगीरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरीष्ठ
गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (पंचायत युवा
क्रीडा खेल व अभियान) मधील राष्ट्रीयस्तरावरील पदकविजेते खेळाडू तयार केले असतील असा
क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करु शकतो.
गुणवंत क्रीडा
कार्यकर्ता क्रीडा संघटक, कार्यकत्याने
सतत दहा वर्ष महाराष्ट्र क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने
वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्ह्यातील कामगीरी
ग्राह्य धरली जाईल. क्रीडा कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन पुढील तीन प्रकारे
करण्यात येते. विकासात्मक कार्य - संघटक कार्यकर्ते यांच्या सक्रीय प्रयत्नातून अधिकृत
खेळांची किती मैदाने त्यांच्या जिल्ह्यात उभारली गेली. किती व्यायाम शाळा, क्रीडा संस्था,
संघटना स्थापन करण्यात आल्या. दहा वर्षात किती अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय, राज्य, विभागीय,
जिल्हास्तरीय भरविला व अर्जदाराची कोणती जबाबदारी होती ती स्पष्ट करावी.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे
प्रस्ताव दि. 26 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. दि. 26 डिसेंबर
2016 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. यांची नोंद जिल्ह्यातील उत्कृष्ट
कामगिरी करणऱ्या गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता
यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment