फळपिकावर किडरोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन करण्यात येणार
हिंगोली, दि. 19 :- राष्ट्रीय कृषि विकास योजना
2016-17 अंतर्गत फळपिकावरील किडरोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन करण्यात
येणार आहे.
योजनेचा उद्देश -
जिल्ह्यातील केळी या पिकाचे सर्वेक्षण करून किड रोगाचा प्रादुर्भावाबाबत
शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे, किडरोगाच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे, किडरोगाचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात आल्याने
पुढील संभाव्य नुकसान टाळुन उत्पादनात वाढ करणे, किडरोगाबाबत शेतकऱ्यांना
प्रशिक्षीत करून किडरोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे, किडरोग प्रादुर्भाविन
क्षेत्रासाठी आपत्कालीन पिक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे. सदर योजनेचे कार्यक्षेत्र - जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात
केळी पिकाचे अधिक क्षेत्र असल्यामुळे दोन तालुक्याची निवड करण्यात आली आहे.
मनुष्यबळ - या
योजने अंतर्गत महात्मा फुले मल्टीसर्विसेस परभणी या संस्थेकडून कंत्राटी
किडसर्वेक्षक 2, संगणक प्रचालक 1 व उपविभाग स्तरावर किडनियंत्रक तथा 1 कृषि
पर्यवेक्षक यांची प्रतिनियुक्ती केली असून किडसर्वेक्षक यांचेकडून सर्वेक्षणाचे
काम करून घेणे त्यांचेवर सनियंत्रण करणे, मासिक अहवाल करणे, पाक्षिक अहवाल,
उपस्थिती अहवाल सल्ला तालुकास्तरावर व शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देणे ही
कामे उपविभाग स्तरावरून करण्यात येतात. तरी या योजने अंतर्गत वेळोवेळी येणारे
सल्ले शेतकऱ्यांनी अमलात आनुन उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन बोथीकर, कृषि
पर्यवेक्षक खंदारे व उपविभागीय कृषि अधिकारी यु. जी. शिवणगावकर यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment