30 December, 2016

रयत शिक्षण संस्थेतर्फे वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. 30 :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक 23 ते 25 जानेवारी, 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे तसेच दि. 19 ते 21 जानेवारी, 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धांचे यशवंतराव चव्हाण इस्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांची माहितीपत्रके सर्वत्र पाठविली असून ती रयत शिक्षण संस्थेच्या www.rayatshikshan.eduwww.erayat.org या वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहेत. या माहितीपत्रकात स्पर्धेविषयीचे नियम, अटी व तपशील दिलेला आहे.
या स्पर्धांच्या प्रवेशिका (रजिस्ट्रेशन) स्वीकारण्याची अंतिम तारीख वक्तृत्व स्पर्धेसाठी दि. 16 जानेवारी, 2017 असून प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दि. 15 जानेवारी, 2017 अशी आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा फोन नं. 02162-231074 वर संपर्क साधावा. स्पर्धांचे विषय खालीलप्रमाणे आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे विषय. (वर्ष 30 वे) :- 1) डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रेरणास्थाने, 2) आजच्या तरुणांपुढील आव्हाने, 3) स्वातंत्र्याची सत्तर वर्षे आणि माझ्या स्वप्नातील भारत, 4) सामान्य जनतेची हरवली शांती.. म्हणे देशात आली अर्थक्रांती !, 5) जीवनगाणे गातच रहावे…
पारितोषिके : प्रथम रु. 7 हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय रु. 6 हजार व स्मृतीचिन्ह, तृतीय रु. 5 हजार व स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ ( एकूण 10 ) प्रत्येकी रु. 2 हजार रु. व स्मृतीचिन्ह, सांघिक चषक – 1 ( टीमसाठी ).
            पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अभ्यासक्रम. (वर्ष 12 वे) :- अभ्यासक्रम :-  इतिहास, महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक, भारताचा भूगोल, महाराष्ट्र व भारत - राज्‍यव्यवस्था आणि शासन, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, मूलभूत विज्ञान, कृषी, पर्यावरण, मानवसंसाधन विकास, मानवी हक्क, तंत्रज्ञान, क्रीडा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार व त्यांचे स्वरूप, चालू घडामोडी, साहित्य व संस्कृती कला, ऑडियो व व्हिडीओ प्रश्न.
            पारितोषिके : प्रथम रु. 7 हजार व स्मृतीचिन्ह, व्दितीय रु. 6 हजार व स्मृतीचिन्ह, 3) तृतीय रु. 5 हजार व स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ रु. 3 हजार रु. व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ रु. 2 हजार रु. व स्मृतीचिन्ह.

***** 

No comments: