17 December, 2016

आधारभूत योजनेंतर्गत शेतमालाच्या विविध पिकांसाठी हमीभाव निश्चित

हिंगोली, दि.17: सन २०१६-२०१७ च्या खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली शेतमालाच्या विविध पिकांची खरेदीसाठी शेतमालाच्या विविध पिकांसाठी प्रति क्विंटल आधार किंमत निश्चित केली
केंद्र शासनाने शेतमालाच्या विविध पिकांसाठी प्रति क्विंटल आधारभूत किंमत निश्चित केली असून, यात धानासाठी साधारण १हजार ४७०  रुपये प्रति क्विंटल, दर्जा हजार ५१० रुपये, गुणवत्ता दर्जाचे विनिर्देश - एफएक्यू दर्जाचे शासनाने ठरविलेल्या निकषानुसार. ज्वारी संकरीत हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल, ज्वारी (मालदांडी) हजार ६५० रुपये, बाजरी हजार ३३० रुपये, मका हजार ३६५ रुपये प्रति क्विंटल, रागी (नाचणी) 1 हजार 725 रुपये प्रति क्विंटल, तुर 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल, मूग 5 हजार 225 रुपये प्रति क्विंटल, उडीद 5 हजार रुपये प्रति क्विंटल, भुईमुग 4 हजार 220 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 2 हजार 775 रुपये प्रति क्विंटल, सुर्यफुल 3 हजार 950 रुपये प्रति क्विंटल, कारळे 3 हजार 825 रुपये प्रति क्विंटल, तीळ 5 हजार रुपये प्रति क्विंटल आणि कापुस मध्यम स्टेपल 3 हजार 860 रूपये तर लांब स्टेपल 4 हजार 160 रुपये प्रति क्विंटल किंमत निश्चित केली आहे
वरील नमुद दरापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी  करीत असल्यास त्याची तक्रार खालील ठिकाणी करावी. यात सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती. मो. क्र. 9923000852, सहाय्यम निबंधक, सहकारी संस्था, ता. हिंगोली  मो.क्र. 9763046738 आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली मो. क्र. 9423682632 यावर संपर्क साधुन आपली तक्रार नोंदवावी
या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी आपला शेतीमाल जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचेमार्फत सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असे आवाहन जिल्हाधिकारीअनिल भंडारी यांनी केले

****

No comments: