सार्वजनिक
खाजगी भागीदारी तत्वावर
सघन
कुक्कुट विकास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 28 :- राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये सार्वजनिक
खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास योजने अंतर्गत हिंगोली जिल्हयाचा समावेश
आहे तरी या योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन सघन कुक्कुट गटाची स्थापना करण्याचे उद्दिष्ट
आहे. या योजनेमये ज्या पशुपालकांकडे स्वत:चे लघु अंडी उबवणी यंत्र (सेंटर व हेंचर)
तसेच स्वत:च्या मालकीची 2 हजार 500 चौरस फुट जागा असावी अशा पशुपालकांना प्राधान्य
आहे.
सदरील योजनेसाठी सर्व पशुपालकांनी दि. 02 जानेवारी,
2017 ते 01 फेब्रुवारी, 2017 या कालावधीत विहित नमुन्यामध्ये तालुकास्तरावर पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन हिंगोलीचे
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment