23 December, 2016

विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 23 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या इ. 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , इ. 5 वी ते 10 वी च्या अनुसूचित जाती / विजाभज / विमाप्र इ. प्रवर्गांतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती तसेच सर्व प्रवर्गातील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती इत्यादी शिष्यवृत्ती दिल्या जातात. सदरील शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे व आधार क्रमांक हा विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या बँक खात्याशी संलग्न करुन त्याची पोचपावती जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे सादर करणे अनिवार्य आहे. आधारक्रमांक बँक खात्याशी संलग्न न केल्यास अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही.
तसेच शाळांनी मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे ऑॅनलाईन अर्ज भरावेत. भरलेले अर्ज या कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करून अर्जाची यादी (हार्ड कॉपी), आधार संलग्नीकरण पोचपावती, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व उपरोक्त त्या-त्या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मुख्याध्यापकांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तात्काळ दाखल करावेत. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आ. ब. कुंभारगावे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

*****

No comments: