14 December, 2016

केबल ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसवणे अनिवार्य
           हिंगोली, दि. 14 :- केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्रालयाच्या दि. 11 सप्टेंबर, 2014 चे निर्देशानुसार फेज 3 मधील शहरी भागात दि. 31 डिसेंबर, 2015 पर्यंत तसेच फेज 4 मधील ग्रामीण भागाकरिता दि. 31 डिसेंबर, 2016 पर्यंत सर्व केबल टिव्ही धारकांनी सेट टॉप बॉक्स बसवणे अनिवार्य आहे. दि. 01 जानेवारी, 2017 पासुन केबल सिग्नल पुरवठा हा सेट टॉप बॉक्स शिवाय चालु राहणार नाही.
                याकरिता केबल जोडणी धारकांनी आपल्या केबल चालकांशी तात्काळ संपर्क साधुन त्यांचेकडून सेट टॉप बॉक्स घेवुन टिव्हीस जोडुन घ्यावा. रविवार दि. 01 जानेवारी, 2017 पासुन सेट टॉप बॉक्स शिवाय केबल सिग्नल पुरवठा चालु राहणार नाही आणि केबल चालकांनी आपल्या अधिनस्त असलेल्या जोडणी धारकांकडे तात्काळ सेटटॉप बॉक्स बसवुन केबल सिग्नल पुरवठा सुरळीत चालु राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: