09 December, 2016

मुद्रा बँक योजनेच्या तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 9 : राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच देशातंर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यात मुद्रा बँक योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेनूसार शिशु, किशोर आणि तरुण या तीन गटातंर्गत उद्योग उभारणीसाठी कुठल्याही प्रकारच्या तारणाशिवाय पात्र लाभार्थ्यांना 10 हजार ते 10 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांना जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे. परंतू सदर कर्ज मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारची समस्या किंवा अडचण निर्माण झाल्यास लाभार्थ्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली दूरध्वनी क्रमांक 02456 – 221461 आणि व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, दूरध्वनी क्रमांक 02456 – 221692 यावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

No comments: