16 December, 2016

शासकीय कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन सर्वंकष माहितीकोष अद्यावत करण्याचे आवाहन  

हिंगोली, दि. 16 :- महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचा-यांचा, तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, यातील कर्मचा-यांचा सर्वंकष माहितीकोष 2016 हा 01 ऑक्टोबर या दिनांकास अद्यावत करण्याचा निर्णय दि. 03 डिसेंबर, 2016 च्या परिपत्रकान्वये राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील राज्य शासन, जिल्हा परिषद, मधील सर्व कर्मचा-यांचा माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आली आहे.
2016 च्या कर्मचारी माहितीकोषात मागील कर्मचारी माहितीकोष 2015 मधील संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. व नवीन माहितीकोषात संबंधीत कार्यालयात नव्याने रुजु झालेल्या कर्मचाऱ्याची माहिती, कर्मचा-याचे नाव, सेवार्थ ID क्रमांक, .नि.नि. खाते क्रमांक, पॅन क्रमांक, जन्मदिनांक, सेवा रुजू व निवृत्ती दिनांक, स्त्री/परुष, जात, धर्म इत्यादी सर्व बाबींची माहिती https://mahasbd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व कार्यालयांनी अद्यावत करावयाची आहे. तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्याची बदली झाल्याबाबतची माहिती अद्यावत करावयाची आहे. सदर संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्याकरिता जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालयामधुन USER ID आणि PASSWORD प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. सदर कर्मचारी माहितीकोषाचे पुर्ण काम अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली पुर्ण करण्यात येणार आहे. सदर माहितीकोषामध्ये सर्व कार्यालयांनी कार्यालयाची तसेच कर्मचा-यांची माहिती माहे जानेवारी 2017 अखेर अद्यावत करावी अन्यथा संबंधित कार्यालयाचे माहे जानेवारीमे, 2017 चे वेतन देयके जिल्हा कोषागारामध्ये पारित होणार नाहीत. त्या अनुषंगाने सदर माहितीकोषामध्ये माहिती अद्यावत करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी  श्री. पारवेकर यांनी केले आहे.

*****

No comments: