जिल्ह्यात 1368 उमेदवार देणार लिपिक-टंकलेखक पुर्व परीक्षा
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु
हिंगोली, दि. 9 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या लिपिक-टंकलेखक (मराठी / इंग्रजी) पुर्व परीक्षा 2017, रविवार, दि. 11 जून,
2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 या वेळात हिंगोली जिल्हा मुख्यालयी 05
उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 05 उपकेंद्रावर 1 हजार 368 उमेदवार
परीक्षेस बसले आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दुष्टीकोनातुन परीक्षेत
बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके,
पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची
साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणुन वापरण्यायोग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा
आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यास परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच
परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास आयोगामार्फत सक्त मनाई करण्यात
आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या द्दष्टीकोणातून परीक्षा
केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती हाताळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया
संहिता 1973 चे कलम 144 परीक्षा केंद्रावर लागु करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा
मुळ पुरावा व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सुचनेनुसार आयागाने परवानगी दिलेल्या साहित्यासह
उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परीक्षा केंद्रावर पोलीस
बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेश दारावर पोलीसांमार्फत
तपासणी करण्यात येणार आहे.
सदरील परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे (ब्ल्यु
टुथ, हेड फोन, स्मॉल कॅमेरा फिटेड ऑन वॉचेस/शर्ट बटन/पेन्स/रिंग्स/स्पाय
कॅमेरा/स्मार्ट वॉचेस/लेन्सेस) यासारख्या साधनासह आयोगाने बंदी घातलेल्या इतर
कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा
/ गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द
फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात
येईल याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल
भंडारी यांनी केले आहे. तसेच सदर परीक्षेस नियुक्त करण्यात आलेल्या उपकेंद्र
प्रमुख/पर्यवेक्षक/समवेक्षक/लिपिक यांनी परीक्षेच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास
किंवा गैरहजर राहिल्यास त्याच्या विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
*****
No comments:
Post a Comment