शासकीय
बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्रात प्रवेशासाठी आवाहन
हिंगोली दि. 5 :
शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र, (हौसिंग सोसायटी, यादव हॉस्पीटलच्या
पाठीमागे) अंबाजोगाई जि. बीड या संस्थेत सन 2017-18 या चालु शैक्षणिक वर्षासाठी अपंग
मुलांना (अंध, अस्थिव्यंग व मुकबधीर प्रवर्ग) प्रवेश देण्याकरिता खालील पात्रताधारक
उमेदवारांनी अर्ज करावेत.
1) मुलांचे वय 6 ते 14 वर्षे या गटातील असावे. 2) मुलगा
अंध, अस्थिव्यंग व मूक-बधीर यापैकी कोणत्याही एकाच प्रकारे अपंग असावा. 3) मुलगा संसर्गजन्य
रोगाने पिडीत किंवा मंदबुध्दी असु नये.
प्रवेशित अपंग विद्यार्थ्यांना राहाणे, जेवण, कपडे, शैक्षणिक
साहित्य, वैद्यकिय उपचार इ. विनामुल्य सुविधा असून तज्ज्ञ अनुभवी व प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांमार्फत
शैक्षणिक, वैद्यकिय उपचार व शारिरीक पुनर्वसन इत्यादी विनामुल्य शासनामार्फत केले जाते.
तरी गरजूनी प्रत्यक्ष किंवा पत्राव्दारे संपर्क साधावा.
विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून दि. 17 जून,
2017 पर्यंत विनामूल्य मिळतील.
प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 23 जून, 2017 पर्यंत
राहील. कार्यालयाचा पत्ता - अधिक्षक, शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र, हौसिंग
सोसायटी, यादव हॉस्पीटलच्या पाठीमागे, अंबाजोगाई जि. बीड. असे आवाहन अधिक्षक शासकीय
बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र, अंबाजोगाई जि. बीड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment