जिल्हा
सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा
हिंगोली,दि.29 :
महान संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांचा जन्मदिवस दि. 29 जून हा ‘राष्ट्रीय
सांख्यिकी दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आज जिल्हा
सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद
कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी आर.के. गायकवाड व
डी.आर.आव्हाड आणि जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी म्हणाले की, दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबीस यांच्या प्रतिमानावर आधारित तयार करण्यात
आली होती. प्रशांत चंद्र महालनोबीस हे पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी नियोजन
मंडलाचे सदस्य ही होते. प्रशासनामध्ये संख्याशास्त्राचा जास्तीत-जास्त्ा
प्रभावीपणे कसा वापर करता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न्ा करण्याचे आवाहन केले.
महान संख्याशास्त्रज्ञ पी. सी. महालनोबिस यांच्या जीवनकार्याविषयी संशोधन सहाय्यक
नितीन पाटील यांनी माहिती दिली. जिल्हा नियोजन कार्यालयातील संशोधन सहाय्यक
व्यंकटेश भारती यांनी देखील याप्रसंगी
आपले मनोगत व्य्ाक्त्ा केले.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा सांख्यिकी अधिकारी पारवेकर यांनी यावर्षीचा विषय
‘प्रशासकीय सांख्यिकी’ असल्याचे सांगून प्रशासनामध्ये सांख्यिकीचे महत्व याबाबत
विविध दाखले देत विषद केले.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते महान
संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सर्व
अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनीधी विवेक डावरे यांची
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लिपीक सुनिल भेासले यांनी केले तर नितीन
पाटील यांनी आभार मानले.
*****
No comments:
Post a Comment