शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे
आवाहन
हिंगोली,
दि. 22 : समाज कल्याण विभागामार्फत
शाळेमधून किंवा कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या परीक्षेत सर्व
विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती,
विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असल्यास त्या विद्यार्थी
/ विद्यार्थींनीला राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेंतर्गत रुपये 5 हजार
प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जातो. सदर पुरस्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत
आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1) मुख्याध्यापक / प्राचार्य यांचे पत्र,
2) विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, 3) विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्याची
छायांकित प्रत, 4) शाळा सोडल्याचा दाखल्याची छायांकित प्रत, 5) विद्यार्थ्यांचे नावाचे
बँक खाते क्रमांकाची बँक पासबुकची छायांकित प्रत, 6) पात्र विद्यार्थ्यांचे नाव रेखाकिंत
करून इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या बोर्डाचा विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या
संपूर्ण निकालाची छायांकित प्रत.
तरी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य
यांनी उपरोक्त योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव वरील आवश्यक कागदपत्रासह
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयात दि. 25 जून, 2017 रोजी दु.
4.00 वाजेपर्यंत सादर करावेत अन्यथा पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित
मुख्याध्यापक / प्राचार्य हे जबाबदार राहतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment