05 June, 2017

वेतन पडताळणी पथकाचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली, दि. 5 : औरंगाबाद येथील लेखा व कोषागारे कार्यालयाचे वेतन पडताळणी पथक दिनांक 06, 07, 08 व 09 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहे. तरी सदरील दिवशी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी सादर करण्याचे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे दि. 06 जून, 2017 रोजी पडताळणी पथक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली यांच्याकडील कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकांची पडताळणी करेल. तर दि. 07 ते 09 जून, 2017 या कालावधीत जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापूर्वी सर्व आहरण व संवितरण शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299 / प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावुन त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत सेवा पुस्तके पडताळणीस सादर करतांना पुढील एक पर्षात सेवा निवृत्त होणारी प्रकरणे, मयत, मा. न्यायालयीन/लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करतांना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रणालित DDO Login करावे. DDO Login करण्यासाठी BDS साठी वापरण्यात येत असलेले Username and Password वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे. त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकुन Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                                                *****  

No comments: